22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रदसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा ‘प्लॅन इ’?

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा ‘प्लॅन इ’?

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवाजी पार्क मैदानावर होणा-या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने पर्यायांचा शोध सुरू केला आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहीत बीकेसीतील मैदानाची मागणी केली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेमार्फत दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी पत्र लिहिले आहे. बीकेसीमध्ये दसरा मेळावा आयोजित करता यावा याकरता परवानगीसाठी पत्र लिहिण्यात आले आहे.

एकीकडे शिंदे गट मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिंदे गटाची या मेळाव्यासंदर्भात काल रात्री उशिरापर्यंत खलबतं झाली. यात जे काही होईल ते नियमानुसार होईल म्हणत शिवाजी पार्कवरच दसरा मेळाव्याचा निर्धार शिंदेंनी व्यक्त केला आहे.

शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याची चाचपणी शिंदे गट आणि शिवसेना यांच्याकडून सुरू आहे. सोमवारी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशातच आता शिवसेनेने मागितलेल्या परवानगीमुळे शिवाजी पार्कनंतर बीकेसीतील मैदानासाठीही शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेकडून अर्जांची छाननी सुरू
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार? उद्धव ठाकरेंचा की शिंदे गटाचा? या संदर्भात मुंबई महाालिका लवकरच निर्णय घेणार आहे. गणेशोत्सव संपल्याने मुंबई महापालिका आता दोन्ही बाजूच्या अर्जांची छाननी करणार आहे. या संदर्भातील अहवाल मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवला जाईल आणि त्यानंतर आयुक्त निर्णय जाहीर करतील. दरम्यान शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाही तर शिंदे गटाने बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानाचा पर्याय ठेवला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी तशी माहिती दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या