22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रदसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला? हायकोर्टात जोरदार युक्तिवाद, दुपारुन पुन्हा सुनावणी

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला? हायकोर्टात जोरदार युक्तिवाद, दुपारुन पुन्हा सुनावणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान शिवसेना आणि महापालिकेकडून आपापली बाजू मांडण्यात आली आहे. अद्याप अंतिम निकाल हाती आलेला नसला तरी दुपारनंतर निकाल अपेक्षित आहे. कोर्टातील सुनावणी लंचसाठी तहकूब करण्यात आली आहे. दुपारच्या सत्रात सुनावणी सुरू राहील.

शिवसेनेनं आणि त्यानंतर शिंदे गटानं हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. यानंतर या मुद्द्यावर आज हायकोर्टात सुनावणी पार पडली.

ठाकरे यांचे वकील आस्पी चिनॉय यांचा जोरदार युक्तिवाद
ठाकरे यांचे वकील आस्पी चिनॉय यांनी बाजू मांडताना म्हटलं की, राज्य सरकारनं साल 2016 मध्ये अध्याधेश काढलेला आहे. ज्यात राज्य सरकारनं आम्हाला दसऱ्याच्या दिवशी मेळवा घेण्याची रितसर परवानगी दिलेली आहे. अपवाद केवळ गेल्या दोन वर्षांच्या ज्यात कोरोनामुळे तो होऊ शकला नाही. शिवसेनेचे पदाधिकारी या नात्यानं अनिल देसाई यांनी पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. मात्र पालिकेनं कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव ती नाकारलीय. मी सर्व मुद्यांवर सविस्तर भूमिका मांडणार आहे, असं चिनॉय यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या