23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रशिवाजी पार्क मेळाव्याचा फैसला शुक्रवारी हायकोर्टात

शिवाजी पार्क मेळाव्याचा फैसला शुक्रवारी हायकोर्टात

एकमत ऑनलाईन

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेना की शिंदे गट यापैकी कोणाला परवानगी मिळणार, याचा पेच कायम होता. अखेर महानगरपालिकेने आज शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना परवानगी नाकारली. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने दोन्ही गटांना एक पत्र दिले आहे. मनपाने परवानगी नाकारल्यानंतर आता यासंबंधीचा फैसला शुक्रवारी हायकोर्टात होणार आहे.

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावर गुरुवारी दुपारी १२ वाजता हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. सुधारित याचिका दाखल करण्यासाठी ठाकरे गटाने कोर्टाला वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर आज दुपारी अडीच वाजेपर्यंत सुधारित याचिकेसाठी कोर्टाने वेळ वाढवून दिला होता. या दरम्यान शिवसेनेने सुधारित याचिका दाखल केली.

गणेशोत्सवाच्या आधीपासून शिवसेनेने परवानगीसाठी बीएमसीकडे अर्ज केला होता. मात्र, त्यावर रितसर परवानगी मागूनही चालढकल केल्याने शिवसेनेने हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. महापालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीदेखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाजी पार्कवर मेळाव्याला शिंदे गटालाच परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात येत आहे.

मनपाने उपस्थित केला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे अर्ज शिवसेनेतील दोन गटांकडून पालिकेत दाखल करण्यात आले होते. मात्र, कोणत्याही एका गटाला ही परवानगी दिली गेल्यास या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही दोघांनाही परवानगी नाकारत आहोत, असे मनपाने स्पष्ट केले.

मेळावा शिवतीर्थावरच, उद्धव ठाकरेंची घोषणा
बुधवारी गोरेगावमध्ये शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. त्यात उद्धव ठाकरे यांनी यंदाचा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, अशी घोषणा केली. तसेच आज एवढी गर्दी तर दसरा मेळाव्याला किती गर्दी असेल, असे म्हणत दस-याला गद्दारांची लक्तरे काढणार, असा इशाराही ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या