28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रशिवाजी पार्कचा दसरा मेळावा शिंदेंचाच झाला पाहिजे

शिवाजी पार्कचा दसरा मेळावा शिंदेंचाच झाला पाहिजे

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेतील बंडाळीनंतर खरी शिवसेना कोणती? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे. अशातच आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दसरा मेळाव्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे आणि शिवाजी पार्कचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचाच झाला पाहिजे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बोलताना म्हणाले की, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतो आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला ख-या शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.

रामदास आठवलेंनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घ्यायला पर्यायही उपलब्ध करुन दिला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बीकेसीकिंवा इतर कुठे मेळावा घ्यायला हरकत नाही. मात्र शिवाजी पार्कचा दसरा मेळावा जो आहे तो एकनाथ शिंदेंचाच झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं त्यांना परवानगी द्यावी, अशी आमची महापालिकेला सूचना असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री आज कल्याणमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत हे वक्तव्य केले आहे.

सध्या राजकीय वर्तुळात आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम असल्याचं स्पष्ट केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या