22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रशिवांगी डबास अटकेत; पोलिसांवर हात उचलल्याचा आरोप

शिवांगी डबास अटकेत; पोलिसांवर हात उचलल्याचा आरोप

एकमत ऑनलाईन

मुंबई : सोशल मीडियावर मिस जाटनी आणि बुलेट रानी नावाने प्रसिद्ध असलेली शिवांगी डबासला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. शिवांगी पोलिस कर्मचाऱ्याच्या स्कूटीला धडकल्याचा आरोप आहे. पोलिस कर्मचाऱ्याची माफी मागितली. आईनेही पायाला हात लावून माफी मागितली. मात्र, पोलिसांनी मारहाण केली. शिवांगीने म्हटले आहे. त्याचवेळी शिवांगीने हात उचलल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे.

शिवांगी डबास सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शिवांगी डबास मैत्रिणीसोबत घरी परतत होती. यावेळी तिने महिला पोलिस कर्मचारी ज्योती शर्मा यांना स्कूटीने धडक दिली. शिवांगी व्हिडिओमध्ये महिला पोलिसाशी वाद घालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शिवांगी म्हणत आहे की, मी तुझी एकदा माफी मागितली आहे. तरीही तू माझ्यावर हात उचलत आहे.

दोघांमधील वाद वाढल्यानंतर महिला पोलिस कर्मचारी ज्योतीने या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी शिवांगीला घरातून पोलिस ठाण्यात आणले. मधुबन बापुधाम पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी शिवांगीविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या