24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रगडपूजन, शिरकाईच्या गोंधळाने शिवराज्याभिषेक सोहळा

गडपूजन, शिरकाईच्या गोंधळाने शिवराज्याभिषेक सोहळा

एकमत ऑनलाईन

किल्ले रायगड : किल्ले रायगडावर युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गडपूजन करून गडपूजनाने शिवराज्याभिषेक सोहळ््यास सुरुवात झाली. सांयकाळी गडदेवता शिरकाई देवीसमोर पारंपरिक गोंधळ घालण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या नामघोषाने आणि शिवकालीन मर्दानी खेळाने गडावरील वातावरण शिवमय झाले होते.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी सकाळी ध्वजारोहण, पालखी सोहळा आणि राजसदरेवरील मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्ण नाण्याचा अभिषेक समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून गर्दी टाळण्यासाठी सोहळ््याचे सोशल मीडियाद्वारे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि समितीचे प्रमुख श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती दुपारी गडावर चालत आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सोहळ््याच्या तयारीसाठी समितीचे प्रमुख कार्यकर्ते किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत.

या सोहळ्याची तयारी संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे. त्यानुसार अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेंिसह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, विनायक फाळके, संजय पोवार, सत्यजित आवटे, राहुल शिंदे, सागर पाटील, प्रसन्न मोहिते, अमर पाटील, योगेश केदार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले.

२५ कार्यकर्ते : ११०० पोलिसांचा बंदोबस्त
मराठा आरक्षणाच्या धर्तीवर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी ६ जूनपर्यंत राज्य शासनाला निर्णय घेण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. निर्णय न घेतल्यास पुढील भूमिका किल्ले रायगडवरून स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ११०० हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हिंगोलीच्या हळदीला जागतिक बाजारपेठेत स्थान देण्यासाठी करार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या