21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home महाराष्ट्र मंत्री शंकरराव गडाख यांनी बांधले शिवबंधन

मंत्री शंकरराव गडाख यांनी बांधले शिवबंधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे आज हातात शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे नगरमध्ये शिवसेना आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

आज दुपारी शंकरराव गडाख यांनी मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी निकाल लागताच दुसºयाच दिवशी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती.

नार्वेकर यांची शंकरराव गडाख यांच्यासमवेत अनेक वर्षांपासून मैत्री असल्याने विधानसभेत गडाख अपक्ष निवडून येताच नार्वेकर यांनी गडाखांना सेनेत येण्यासाठी आग्रह धरला होता. सेना सतेत असो वा नसो मी तुमच्याबरोबर राहील असा ठाम शब्द गडाखांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अखेर गडाख यांनी सेनेत प्रवेश केला.

नगर जिल्ह्यातील गडाख कुटुंब हे राजकारणातील मात्तबर नेते आहेत. जिल्ह्यात सेनेचे माजी मंत्री व उपनेते अनिल राठोड यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र, गडाख यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढीला मोठी मदत होणार आहे.

१ सप्टेंबरपासून शाळा सुरू होण्याची शक्यता धूसरच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या