21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेत होणार खांदेपालट !

शिवसेनेत होणार खांदेपालट !

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यावर शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिका-यांच्या आणि शिवसैनिकांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. शिंदे यांना समर्थन देणा-या पदाधिका-यांच्या जागेवर नवीन नेत्यांच्या नियुक्तीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर विभाग आणि शाखाप्रमुखांची बैठक घेतली. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई शिवसेनेत खांदेपालट होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत विभागवार शिवसेना मजबूत करा असे आदेश देण्यात आले आहेत. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही तयारी सुरू असून काही पदाधिकारी शिंदे गटात जाण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेनेत आता खांदेपालट होणार आहे. दरम्यान या बैठकीत उद्या होणा-या आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या निर्णयात न्याय मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

महत्वाचे निर्णय ……..
विभागवार पक्ष मजबूत करण्याचे आदेश
अनेक ठिकाणी खांदेपालट होण्याची शक्यता
शिंदे समर्थकांच्या जागी नवीन नेमणुका होण्याची शक्यता
आजच्या सुनावणीत न्याय मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला.
महापालिका निवडणुकांच्या वॉर्ड रचनेनंतर तयारी कशी करायची यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.

येत्या काळात पदाधिका-यांच्या बदल्या होऊ शकतात त्यासाठी कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेची तयारी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या