25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रभाजप आमदार जयकुमार गोरेंना झटका ; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच

भाजप आमदार जयकुमार गोरेंना झटका ; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानंही बुधवारी नामंजूर केला. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे गोरेंची अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सत्र न्यायालयात शरण जाऊत रितसर जामीन घेण्याचे निर्देश दिले आहेत. वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती.

मात्र कुठेच दिलासा न मिळाल्यानं जयकुमार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या