Sunday, September 24, 2023

धक्कादायक : जालन्यात 31 नवीन रूग्णांची वाढ,कोरोना रुग्ण संख्या 554 वर

जालना  :  जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत या महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे. आज सकाळी तब्बल 31 रुग्णांची वाढ झाली असून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 554 वर पोहोचली आहे. जालना शहरातील रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून होत असलेली वाढ ही शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब असून प्रशासनही हादरून गेले आहे.

कोणत्या भागात आढळले रुग्ण

जिल्हा रुग्णालयातर्फे प्रयोगशाळेकडे 84 संशयित रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी 31 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील 4 रुग्णांसह जालना शहरातील वीणकर मोहल्ला 7, हॉटेल अमितजवळील 3, वसुंधरानगर 3, जुना जालना भागातील संजोगनगर 2, मस्तगड, भरतनगर, व्यंकटेश नगर, जेपीसी बॅंक कॉलनी, बरवार गल्ली, संभाजी नगर, सत्कर नगर, अकेली मस्जिद, मिशन हॉस्पिटल, मंगल बाजार, नरिमन नगर आणि पेन्शनपुरा या भागातील प्रत्येकी एक याप्रमाणे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Read More  1 जुलैनंतर तुम्ही पीएफ अ‍ॅडव्हान्स क्लेम करू शकत नाही

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या