23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home क्राइम ओझर विघ्नहर गणपती मंदिरात चोरी

ओझर विघ्नहर गणपती मंदिरात चोरी

जुन्नर, 28 जुलै : महाराष्ट्रासह देशभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपती मंदिरातून चांदीची छत्री आणि दानपेटी चोरीला गेली आहे.

सोमवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली. मंदिरातून चांदीची छत्री आणि दानपेटी चोरट्याने पळवून नेली आहे. लॉकडाउनच्या काळात सर्व मंदिर आणि देवस्थान तुर्तास बंद आहे. त्यामुळे मंदिरात शुकशुकाट आहे. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने ओझर गणपती मंदिरात चोरी केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिरात धाव घेतली. मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसांनी पाहणी केली आहे. मंदिरापासून काही अंतरावर चोरी केलेले काही वस्तू आढळून आल्या आहे. तसंच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नहर हा सातवा गणपती आहे. विघ्नहर म्हणजे भक्तांचे विघ्न दूर करणारा अशी या गणरायाची ओळख आहे. तसंच अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नहरला ओळखले जाते. विशेष, ओझरच्या या मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी केली असून बांधकाम केलेले आहे. कुकुडी नदीच्या तीरावर हे मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. त्यामुळे चोरीची घटना नेमकी घडली कशी? याचा पोलीस शोध घेत आहे.

Read More  करोनाबाबत चीनच्या प्रशासनाने लपवा-छपवी केली असल्याचा डॉक्टरने केला दावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
33FollowersFollow