19.6 C
Latur
Monday, January 25, 2021
Home महाराष्ट्र औरंगाबादच्या MGM रुग्णालयात महिला डॉक्टरासोबत धक्कादायक प्रकार

औरंगाबादच्या MGM रुग्णालयात महिला डॉक्टरासोबत धक्कादायक प्रकार

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद, 20 ऑगस्ट : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. जीवाची बाजी लावून डॉक्टर कोरोनाशी दोन हात करत आहे. एकीकडे डॉक्टर रुग्णांना कोरोनाच्या मगरमिठ्ठीतून बाहेर काढत आहे तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये लाजीरवाणी घटना घडली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांनी एका महिला डॉक्टरला मारहाण केली आहे.

औरंगाबाद शहरातील महात्मा गांधी मिशन, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली आहे. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. एमजीएम रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला.

आपल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. पण त्यावर समाधान न झाल्यामुळे त्यांनी थेट मोर्चा कोरोनाबाधित कक्षाकडे वळवला. कोरोनाबाधित कक्षात घुसून नातेवाईकांनी महिला डॉक्टरालाच मारहाण केली. यावेळी नातेवाईकांनी कोरोना कक्षात साहित्यांची तोडफोड केला. कोरोना कक्षाचीच नासधूस करण्यात आली.

या प्रकरणी एमजीएम प्रशासनाने सिडको पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एमजीएम प्रशासनाच्या तक्रारीवरुन मृत रुग्णाच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा केला आहे.

नवाब मलिक : आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या