29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रश्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडिया ची विजेती

श्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडिया ची विजेती

एकमत ऑनलाईन

ठाणे : ठाण्यातील प्रसिध्द डॉक्टर संदीप माने यांची कन्या श्रुतिका माने (२०) ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत पहिली आली. श्रुतिका हिचा जन्म इंग्लंडला झाला त्यानंतर ठाणे येथे आल्यावर सिंघानिया स्कूलमधून पुढील शालेय शिक्षण तिने केले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलिया येथील अ‍ॅडलेड विद्यापीठातून अ‍ॅडव्हान्स हेल्थ अ‍ॅण्ड मेडिकल सायन्स पदवीचे शिक्षण घेत आहे.

ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरुणींसाठी मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या ७ स्पर्धकांची ऑनलाईन ऑडिशन व मुलाखत घेण्यात आली. ऑस्ट्रेलिया येथे राहत असलेले राज सुरी यांनी सौदर्य स्पर्धेसाठी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

श्रुतिकाने कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले असून अनेक वक्तृत्व स्पर्धांत तिने यश संपादन केले आहे. तिला अभिनयाची आवड आहे. २००१ साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय राज सुरी यानी मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला सुरुवात केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबई येथे होत असलेल्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधित्व करणार आहे.

महाराष्ट्रातील बंधू-भगिनींचा पाठिंबा
आपल्या यशाबद्दल बोलताना श्रुतिका म्हणाली की, मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी आहे ज्याची मला जाणीव आहे. भविष्यात आणखी काय असेल याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू-भगिनींचा पाठिंबा मिळाला त्यामुळे हे यश मी मिळवू शकले.

वाईबाजार परिसरात मटका जोमात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या