25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रअफगाणी झरीफ बाबा खून प्रकरणी एसआयटी चौकशी

अफगाणी झरीफ बाबा खून प्रकरणी एसआयटी चौकशी

एकमत ऑनलाईन

नाशिक: जुलै महिन्यात येवला पोलीस खून झालेल्या निर्वासित अफगाण सुफी धर्मगुरु झरीफ बाबा यांच्या खुन प्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षकांच्या अधिपत्याखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

येवला पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुलै महिन्यात अफगाणी सुफी धर्मगुरू झरीफ अहमद चिस्ती बाबा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. झरीफ बाबांनी भारतात दाखल झाल्यानंतर स्थानिक सेवेक-यांच्या नावे सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांची मालमत्ता जमवली होती.

या मालमत्तेसाठी झालेले आर्थिक व्यवहारांच्या चौकशी करता ग्रामीण पोलिसांनी आता विशेष चौकशी पथक नियुक्त केले आहे. त्यामुळे आता झरीफ बाबा खून प्रकरणी आणखी धागेदोरे चौकशी समितीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, चिस्ती हे निर्वासित म्हणून मागील पाच वर्षांपासून भारतात अफगाणिस्तानातून आश्रयास आले होते. त्यामुळे त्यांना येथे स्थावर जंगम मालमत्ता खरेदी विक्रीचे अधिकार प्राप्त झालेले नव्हते. त्यामुळे बाबाने सदरची मालमत्ता ओळखीतील लोकांच्या नावावर खरेदी केली होती.

शिवाय बाबाने सुफी विचार प्रणाली सोशल व्हिडिओच्या माध्यमातून मांडत होता. यामुळे अल्पावधित बाबाचे फॅन फॉलोविंग सोशल मीडियावर वाढले होते. त्या माध्यमातून झरीफ बाबास पैसे मिळत होते.

यातून झरीफ बाबास मोठ्या प्रमाणात रक्कम मिळत होती. तसेच विविध संस्थांसह विदेशातून लोक त्यांना रक्कम दान करत होते. कोट्यवधींची मालमत्ता जमविल्याने यातूनच त्यांचा खून करण्यात आल्जयाचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. झरीफ बाबांच्या कोट्यवधीं रुपयांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमार्फत आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

मयत जरीफ बाबा यांचा खून झाल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह शवागारात ठेवण्यात आलेला होता. अफगाणीस्तानमध्ये दफनविधी करायचा असल्याने त्यासंदर्भातील नातलगांना व्हिसा मिळविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यात मृतदेह मुंबईकडे रवाना करून दुतावासामार्फत अफगाणीस्तानाला पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या