30.1 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeमहाराष्ट्रसहा बड्या आयएएस अधिका-यांच्या बदल्या

सहा बड्या आयएएस अधिका-यांच्या बदल्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अधिका-यांच्या बदल्यांची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ३० वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता ६ आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजेश पाटील आणि अजय गुल्हाने यांच्यासह इतर ४ अधिका-यांचा समावेश आहे.

राजेश पाटील, संचालक, सैनिक कल्याण, पुणे यांची बदली सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई येथे करण्यात आली. अश्विन ए. मुद्गल सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची महानगर आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई येथे बदली करण्यात आली. अजय अण्णासाहेब गुल्हाने यांची नागपूर स्मार्ट सिटी, सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागपूर आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांचा अत्ृिारिक्त कार्यभारही सांभाळावा लागणार आहे.

दीपक सिंगला यांची अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए पुणे येथे नियुक्ती करण्यात आली. भाग्यश्री बानायत यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. इंदुरानी जाखर यांची एमएव्हीआयएमच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या