30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रकिंचित दिलासा, राज्यात ५५ हजार नवे रुग्ण

किंचित दिलासा, राज्यात ५५ हजार नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर कायम असून आज ५५ हजार ४११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर राज्यात ३०९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. मात्र, बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणही दिलासा देणारे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे चित्र आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ५० हजारांच्या वर रुग्णसंख्या आढळत होती, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी झाले होते. आज मात्र नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

आज राज्यात ५३ हजार ००५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत २७ लाख ४८ हजार १५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.१८ टक्के इतके झाले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३०९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के इतका आहे, तर राज्यात आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ हजार ६३८ इतका झाला आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा चिंताजनक
राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा साडेपाच लाखांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात ५ लाख ३६ हजार ६८२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील मुंबईत ८९ हजार ७०७ इतके आहेत, तर ठाण्यात ७१ हजार ०६१ उपचाराधीन रुग्ण आहेत, तर पुण्यात सर्वाधिक १०२११५ इतके अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परमबीर सिंग यांची खातेनिहाय चौकशी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या