मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर पावसानं दडी मारली आहे. जून महिना अर्धा संपत आला आहे मात्र मान्सूनचा पाऊस पुरेशा प्रमाणात सुरु झालेला नाही. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अपेक्षेप्रमाणं पाऊस झाला नाही. येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात व्यापला जाईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
कोकणातील काही पट्ट्यात जोरदार तर उर्वरित राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम स्वरुपात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मोसमी पाऊस मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड जिल्ह्यात पोहोचल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मात्र, राज्यात पावसाचा जोर मात्र कमी आहे. मराठवाड्यात मान्सून पोहोचल्याची माहिती हवामना विभागानं दिली आहे.