24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात सापांचा सुळसुळाट; दोन दिवसांत १७ शेतक-यांना सर्पदंश

कोल्हापुरात सापांचा सुळसुळाट; दोन दिवसांत १७ शेतक-यांना सर्पदंश

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : मागच्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले आहे. शेत, वस्त्यांसह जनावरांच्या गोठ्यात विषारी, बिनविषारी सापांचा सुळसुळाट सुरू झाला आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांत विविध ठिकाणी सर्पदंश झालेले १७ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यापैकी चौघेजण गंभीर आहेत. रुग्णांवरील उपचारात हलगर्जी होऊ नये, यासाठी वैद्यकीय यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, शाहूवाडीसह पन्हाळा, करवीर व कागल तालुक्यात सर्पदंश झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. दोन दिवसांतील पावसाने ग्रामीण भागात दैना उडाली आहे.

वाड्या-वस्त्यांवरील घरे, झोपड्यांत जनावरांच्या गोठ्यात किंबहुना पालापाचोळ्याच्या ठिकाणी साप आश्रयाला येतात. नेमके त्या ठिकाणी धक्का लागल्याने सर्पदंश झाल्याच्या घटना घडत आहेत. शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी ९५ टक्के रुग्ण शेतकरी आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या