30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home महाराष्ट्र म्हणून आताच लस घेणार नाही; पवारांनी सांगितले कारण

म्हणून आताच लस घेणार नाही; पवारांनी सांगितले कारण

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : कोरोनावरील लस उत्पादित करणा-या पुण्यातील सिरम इन्स्टय्युटचे मालक सायरस पुनावाला माझे वर्ग मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी तेथे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला तू जास्त फिरत असतोस, तेव्हा प्रतिकार शक्ती वाढविणारी लस घे, असे म्हणत मला बीसीजीची लस दिली होती. नुकतीच या कंपनीच्या दुस-या एका युनिटला आग लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा पुनावाला यांनी मला कोरोनाची लस टोचून घेण्याचा अग्रह केला.

कोरोनावरील लसीसंबंधी सध्या वेगवेगळया चर्चा सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात ही लस कोरोनायोद्धयांना देण्यात येत आहे. तरीही ती घेणे न घेणे यावरून चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आपण आताच ही लस घेणार नसल्याचे सांगितले. त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेताना एक किस्सा सांगत त्यांनी लोकांना मात्र काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नगरमधील खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी पवार आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी करोनासंबंधी भाष्य केले. पूर्वीची स्थिती सांगताना आता परिस्थिती सुधारत असल्याची नगर जिल्ह्याची आकडेवारीही त्यांनी भाषणात सांगितले.

लसीबद्दल ते म्हणाले, कोरोनावरील लस उत्पादित करणा-या पुण्यातील सिरम इन्स्टय्युटचे मालक सायरस पुनावाला माझे वर्ग मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी तेथे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला तू जास्त फिरत असतोस, तेव्हा प्रतिकार शक्ती वाढविणारी लस घे, असे म्हणत मला बीसीजीची लस दिली होती. नुकतीच या कंपनीच्या दुस-या एका युनिटला आग लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा पुनावाला यांनी मला कोरोनाची लस टोचून घेण्याचा अग्रह केला. मात्र, मी म्हणलो आता मी नगरला निघालो आहे. तेथे दोन खासगी हॉस्पिटलची उद्घाटने आहेत. तेथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतो. परिस्थिती गंभीर वाटली तर मुंबईला न जाता पुण्यात येऊन लस टोचून घेतो. मात्र, आज येथे आपण आढावा घेतला तर बरे होण्याचे प्रमाण खूपच चांगले आहे. परिस्थिती सुधारत असल्याचे एकूण चित्र दिसत आहे. त्यामुळे आता मी पुण्याला लस घेण्यासाठी न जाता सरळ मुंबईला जातो.

उजनी कालव्यात बाप लेकीचा बूडून मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या