27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमहाराष्ट्र.. तर कंगनाला त्वरित अटक

.. तर कंगनाला त्वरित अटक

एकमत ऑनलाईन

जळगाव: अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध दाखल खासगी फौजदारी खटल्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करून कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. या पोलिस तपासात कंगना राणावतने सहकार्य न केल्यास तिच्यावर कायदेशीर कारवाइ शक्य असल्याचे असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले.

जळगावात पत्रकारांशी बोलताना निकम यांनी ही माहिती दिली. निकम पुढे म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कंगना राणावतला दोन वेळा समन्स बजावले. तरी ती गैरहजर राहिली. त्यानंतर पोलिसांनी आता कंगनाला तिस-यांदा समन्स पाठवले आहे. कंगनाने या समन्सचे उल्लंघन केले तर पोलीस न्यायालयात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल किंवा बेलेबल वॉरंट मागू शकतात.

जेणेकरून पोलिसांना चौकशीसाठी पुढे मदत होऊ शकते. अर्थात पोलीस याकरता तिला त्वरित अटक देखील करू शकतात. मुंबई पोलिस अ‍ॅक्ट आणि सीआरपीसीतील तरतुदीनुसार कंगनाविरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करू शकतात, असे मतही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

लातूर जिल्ह्यातील २४ कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या शून्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या