30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रतर बंगळुरूवर देखील आमचा अधिकार - जयंत पाटील

तर बंगळुरूवर देखील आमचा अधिकार – जयंत पाटील

एकमत ऑनलाईन

गोंदिया : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सुटणार नाही, असे सांगतानाच कर्नाटकव्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

त्यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहेत. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकेच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे वक्तव्यही सवदी यांनी केलेय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळे सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना फटकारले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री मुंबई मागत असतील तर कर्नाटकची राजधानी बंगळुरूवर आमचा जास्त हक्क आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्यविस्तार केला तो अगदी दिल्लीपर्यंत केला, जर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री मुंबई मागत असतील तर कर्नाटकची राजधानी बंगळुरूवर आपला अधिकार स्वाभाविक आहे. कर्नाटकचा संबंध मुंबईशी कधी आला नाही, मात्र मराठी माणसाचा संबंध दिल्लीपर्यंत आहे, मग आपला कर्नाटकावर जास्त हक्क आहे, तेव्हा अशा प्रकारचे वायफळ बोलू नये असा सल्ला जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.

बुथ कमिट्या मजबूत करा
मुळं ज्यांच्या हातात असतात त्यांचा पराभव अशक्य आहे. तेव्हा बुथ कमिट्या मजबूत करा. प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीही राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर उभे राहिले तरी आपण ती जागा जिंकू शकतो. गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा आणि आपल्या विचारांचा उद्याचा महाराष्ट्र कसा असणार याची संकल्पना लोकांना सांगा. लोकांचे जी कामे असतील ती करून द्या, सरकार आपल्या विचारांचे आहे. सरकार दरबारी लोकांच्या कामाचा पाठपुरावा करा. २०२४ ला तिरोडा विधानसभा राष्ट्रवादीच जिंकणार, असा निश्चयी सूर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तिरोडा विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या सभेत लावला.विदर्भ-पहिला टप्पा या दौ-यादरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तिरोडा विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना २०२४ ला तिरोडा विधानसभा राष्ट्रवादीच जिंकणार, असा निश्चय करण्यास सांगितलं.

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल : उपमुख्यमंत्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या