मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंगळवारी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अचानक पोटाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत धनंजय मुंडे यांनीच स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी जून महिन्यात कोरोनावर मात केली होती. त्यानंतर त्यांनी पूर्वीसारखेच कामही सुरू केले होते. आपल्या प्रकृती विषयी माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले, तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे.
प्रकृती स्थिर असून, उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल. डॉक्टरांच्या चाचण्यांचे रिपोर्टस आल्यानंतरच पोटदुखीचं कारण कळणार आहे. करोनानंतर उद्भवणारा हा त्रास आहे का त्याचेही डॉक्टर निदान करणार आहेत. दरम्यान, धनजंय मुंडे यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना १२ जून रोजी तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा मुंडे यांचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली होती.
मेदवेदेव पॅरीस मास्टर्सचा जेता