22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रकाही लोक मराठी व्याकरण विसरतात - जयंत पाटील

काही लोक मराठी व्याकरण विसरतात – जयंत पाटील

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज ठाकरे यांनी मंगळवारी आपल्या उत्तर सभेमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती. जयंत पाटील यांचा उल्लेख ‘जंत पाटील’ असा करत मनसे हा इतरांना विझवत जाणारा पक्ष असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले होते. यावर मनसे हा विझत जाणारा पक्ष असल्याच्या आपल्या पुर्वीच्या विधानावर आपण ठाम असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, काही लोक मराठी व्याकरण, काना, मात्रा विसरतात. त्यांच्यासाठी पुन्हा वर्ग सुरू करण्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई पालिकेमध्ये शिवसेनेची मत खाण्यासाठी, शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एक स्थान निर्माण करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. यातून भाजपलाच फायदा होणार आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसविरोधात भाजपची डाळ शिजत नसल्याने भाजपने ही बी टीम पाळली आहे. शिवसेनाविरोधासाठी भाजप आणि मनसेची इंटर्नल सेटींग असल्याचा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला. तसेच, मनसेकडे आज भाजपने नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यासाठीच उत्तर सभा होती. दखल घ्यावी, असे या सभेत काहीही नव्हते, असेही पाटील म्हणाले.

शरद पवार पुरोगामी विचारांचे
उत्तर सभेत शरद पवार जातीपातीचे राजकारण करतात, या आपल्या आरोपांचा राज ठाकरेंनी पुनरुच्चार केला. त्यावर शरद पवारांची अशी प्रवृत्ती नाही. ते असे काम करू शकत नाही. कदाचित ईडीच्या धाकाने राज ठाकरे असे आरोप करत असतील असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी पक्ष आहे. असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या