16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रराहुल गांधींना कोणीतरी सल्ला द्यावा

राहुल गांधींना कोणीतरी सल्ला द्यावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यांचे पडसाद राज्यभरात उमटले. अशातच शिवसेनेने त्यांचे मुखपत्र सामनातून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. राहुल गांधी यांना कोणीतरी समजवा असे शिवसेनेने म्हटले आहे.

सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळया नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर सावरकरांच्या पत्राचा दाखला देत राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले. आता यावर शिवसेनेने रोखठोकमधून आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हटले आहे रोखठोकमध्ये?
वीर सावरकरांवर नाहक टीका करून राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले. त्या यात्रेस वीर सावरकरांवरील नाहक टीकेने गालबोट लागले. अंदमानच्या तुरुंगात सावरकरांनी १० वर्षांपेक्षा जास्त काळ नरकयातना भोगल्या त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच, हे राहुल गांधी यांना कोणीतरी समजावून सांगायला हवे, असे रोखठोक मध्ये म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या