22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रतीन पक्षाचे सरकार म्हटल्यावर कोणीतरी नाराज होणारच : भुजबळ

तीन पक्षाचे सरकार म्हटल्यावर कोणीतरी नाराज होणारच : भुजबळ

एकमत ऑनलाईन

नाशिक (प्रतिनिधी) : राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे कोणीतरी नाराज होणारच. पण सरकार मजबूत आहे, असा निर्वाळा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी काँग्रेसमधील नाराज आमदारांच्या मुद्द्यावर हा निवार्ळा दिला. तीन पक्षाचं सरकार असल्यावर कोणीतरी नाराज होणारच. ते स्वाभाविक आहे. मात्र सरकारला त्याचा काहीच धोका नाही. सरकार मजबूत आहे. निधी वाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या ११ आमदारांसोबत चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असं भुजबळ म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी स्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था पुरेशी आहे. प्रत्येक गल्लीबोळात जाऊन कोरोनाची टेस्ट करण्यात आली. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, असं सांगतानाच रुग्ण वाढत असले तरी देशात नाशिकचा रिकव्हरी रेट चांगला आहे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी गुजरातला जाणारे पाणी अडवण्याची गरज असल्याचंही सांगितलं. गुजरातला वाहून जाणारं पाणी नाशिकला वळवणं आवश्यक आहे. आताच हे पाणी अडवलं नाही तर पुढे कधीही हे पाणी अडवणं शक्य होणार नसल्याचं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्यात आल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली . राजपूत प्रकरण सीबीआयकडे गेलं हे बरं झालं. नाहीतर मुंबई पोलीस चांगलं काम करत नाहीत. कुणाला तरी वाचवत आहेत, असा आरोप झाला असता. आता हा तपास सीबीआयकडे गेल्याने सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वैद्यकीय अभ्यासक्रमात महामारी व्यवस्थापन विषयाचा समावेश -डॉ. विनोद कुमार पॉल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या