23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्र  कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है

  कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडले. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार या निवडणुकीत पराभूत झाले असून, संजय राऊतांचा अगदी निसटता विजय झाला आहे.

दरम्यान, या निकालानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है’ असे त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपच्या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आम्ही आमचा पराभव मान्य करतो. काय बरोबर आणि काय चुकले याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही संख्यांवर नजर टाकली तर स्पष्टपणे आमच्याकडे शेवटपर्यंत योग्य संख्या नव्हती. पण आम्ही एक संधी घेतली, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या