21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुखांसह पुत्र, पत्नीला ईडीचे समन्स

अनिल देशमुखांसह पुत्र, पत्नीला ईडीचे समन्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने अनिल देशमुख यांना सोमवार दि. २ ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. याशिवाय अनिल देशमुख यांचे सुपुत्र ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नी यांनाही समन्स बजावले असून, त्यांना सोमवारी चौकशीस हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले. त्यामुळे या तिघांनाही सोमवारी ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही अनिल देशमुख यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांना चौकशीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही.

यापूर्वी अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी प्रकृती आणि कोरोनाच्या कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचे म्हटले होते. तसेच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याचीही विनंती केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु सुप्रीम कोर्टानेही आज दिलासा देण्यास नकार दिल्याने आता चौकशीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पुन्हा समन्स बजावले असून, २ ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नी यांनाही समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अगोदरच न्यायालयानेही यासंदर्भात हस्तक्षेपास नकार दिल्याने चौकशीला सामोरे जाण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल देशमुख यांच्या घरी छापे मारले होते. त्यानंतर ईडीने त्यांना ४ समन्स बजावले होते. मात्र, कोरोनाचे कारण पुढे करीत त्यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. तसेच वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचे कारण पुढे करीत मंगळवारी अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला होता. त्याऐवजी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदविण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. मात्र, आता सोमवारी हजर राहण्याचे समन्स बजावल्याने आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ईडी प्रकरणात दिलासा नाही
ईडी प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तात्काळ दिलासा मिळालेला नाही. ३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय प्रोटेक्शन याचिकेवर विचार करेल. मनी लॉंड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालय मंत्र्यांना कोणताही दिलासा देणार नाही. त्यांच्या खटल्याची चौकशी करणा-या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) समन्सविरोधात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी आव्हान दिले होते. आपल्यासंदभार्तील कारवाई दुर्दैवी असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला होता.

लोवलिनाने केले पदक निश्चित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या