34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रसोयाबीनला मिळतोय विक्रमी भाव

सोयाबीनला मिळतोय विक्रमी भाव

एकमत ऑनलाईन

अमरावती: जिल्ह्यातील खरिपाचे मुख्य पिक असलेल्या सोयाबीनला सध्या बाजारात विक्रमी भाव मिळत आहे. यंदा जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकले नाही, काही ठिकाणी उत्पादनातही मोठी घट झाली आहे. परिणामी सध्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतक-यांकडे सोयाबीन विक्रीसाठी राहीले आहे. दरम्यान, शनिवारी (दि. ६) बाजारात सोयाबीनला विक्रमी प्रतिक्विं टल ५ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला आहे.

यंदा सोयाबीन कापणीच्या काळातही जिल्ह्यात अनेक भागात पाऊस कोसळला होता. पावसामुळे सोयाबीन उत्पादकांना जबर फटका बसला. काही भागात तर सोयाबीनची कापणीसुद्धा करता आली नव्हती. अनेकांची सोयाबीन पावसात भिजल्याने ती तत्काळ विकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतक-यांसमोर पर्याय नव्हता. त्यामुळे पाणी लागलेले सोयाबीन शेतक-यांना २००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दरानेच विक्री करावे लागले होते.

सध्या मात्र मोजक्याच शेतक-यांकडे आणि पावसाच्या संकटानंतर कमी भावात सोयाबीन खरेदी करणा-या व्यापा-यांकडेच सोयाबीन विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे वाढलेल्या दराचा लाभ त्यांनाच होणार आहे.

हरभराही तेजीत, तूर मात्र उतरली
रब्बी हंगामातील हरभ-याचीही कापणी वेगाने होत आहे. तसेच त्याची बाजारात आवकही होत आहे. मात्र सध्यातरी भाव चांगला मिळत असून प्रतिक्विंटल ४ हजार ४०० रुपये ते ४ हजार ७५० रुपये दर मिळत आहे. मात्र तुरीच्या भावात अचानक घसरण झाल्याने शेतकरीवर्ग हवालदील झाला आहे.

बाजारात बनावट फास्टॅगचा सुळसुळाट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या