29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमराठवाडाऔरंगाबाद, परभणीत लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद, परभणीत लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी औरंगाबाद व परभणी जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे पूर्णत: लॉकडाऊनला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद जिल्ह्यात व परभणी जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. शनिवारी पहिल्या दिवशी लॉकडाऊनला नागरिक व व्यापाºयांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, औरंगाबाद, परभणी शहरासह जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने व काही पेट्रोलपंपांचा अपवाद वगळता सर्वत्र बंद असल्याने बाजारपेठा व रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळाला.

औरंगाबाद पोलिस आणि आरटीओ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रिक्षाचालकांना मास्क वापरणे आणि रिक्षात दोनच प्रवासी वाहतूक करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यासाठी आरटीओ कार्यालयाकडून ४ पथके निर्माण करण्यात आली आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठेत शांतता दिसून आली. टाळेबंदीला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे पहायला मिळाले.

यवतमाळमध्ये ३४६ नवे रुग्ण
गत २४ तासांत जिल्ह्यात तीन मृत्यूसह ३४६ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या २२४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

नाशिक व पुण्यात कडक निर्बंध
पुण्यापाठोपाठ नाशिकमधीलही सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीचे वर्ग मात्र पालकांच्या संमतीने ऐच्छिक सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. होम आयसोलेशन न पाळणाºयांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. निर्बंध न पाळणाºया व्यावसायिकांवरही पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जाईल. तसेच होम आयसोलेशनमधील बाहेर फिरणारे सुपर स्प्रेडर त्यांना शोधून जबरदस्ती पालिका रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार, असे जाधव यांनी सांगितले आहे.

पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. तसेच पुण्यातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव
कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला आहे. तसेच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय बंद राहणार आहेत.

नागपुरातही कहर
विदर्भात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत नागपुरात २२६१ नवीन रुग्ण आढळून आले असून ०७ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. याठिकाणी असणाºया कोव्हिड वॉर्डातून सकाळी सात वाजता एक कोरोना बाधित रुग्ण न सांगता पसार झाला होता. इतर अन्य रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर त्यांच्या मागे हा रुग्ण निघून गेल्याची घटना घडली आहे. संबंधित रुग्ण हिंगणघाट येथील आहे.

औरंगाबादेत होम आयसोलेशनला आता परवानगी
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर जात असल्याने आता महापालिकेने आता होम आयसोलेशनचा पर्याय पुढे आणला आहे. साठ वर्षांखालील व कमी लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीचे होम आयसोलेशन (घरातच विलगीकरण) करण्याचे आदेश प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, साठ वर्षांखालील ज्या व्यक्तींना होम आयसोलेशनची सुविधा हवी आहे, त्यांना फिजिशियनने केलेल्या शिफारशीशिवाय ही सुविधा मिळणार नाही. कोआॅर्बीट आजार नसलेल्या (मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर, किडनी आदी स्वरूपाचे आजार) व्यक्तींना होम आयसोलेशन करण्यात यावे.

सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींनी खासगी वैद्यकीय व्यावसायिक (फिजिशियन) एम.डी. (मेडिसीन) यांच्या आधिपत्याखालील उपचार घेण्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांची आवश्यकतेनुसार प्राथमिक तपासणी (रक्त तपासणी, एक्स- रे इतर तपासणी) करावी. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी गरजेनुसार रुग्णास रुग्णालयात भरती करावे, त्याची संपूर्ण जबाबदारी खासगी वैद्यकीय व्यावसायिकाची असणार आहे. रुग्णास दहा दिवस देखरेख आवश्यक असेल. व्हीडीओ कॉल, फोनव्दारे किंवा प्रत्यक्ष भेटून उपचार करू शकतात असे प्रशासकांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

अबब….नांदेडात ५९१ जण कोरोना पॉझिटीव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या