23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रएसटीच्या हाफ तिकिटासाठी निवृत्त आयएएस अधिका-याचा आटापिटा!

एसटीच्या हाफ तिकिटासाठी निवृत्त आयएएस अधिका-याचा आटापिटा!

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : निवृत्त आयएएस अधिकारी एसटी बसने प्रवासाला निघाले आणि अर्धे तिकीट दिले नाही म्हणून थेट नियमाला भिडले. नियमावरून कंडक्टरही अडले. हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोचले. मग पोलिसांनी महाराष्ट्राचे नियम सांगितल्यावर थंडावले.

उत्तर प्रदेश केडरचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एम. एम. रस्तोगी आणि म्हैसूर (कर्नाटक) येथे केंद्र शासनाच्या सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी अँड रीसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (सीएफटीआरआय) वैज्ञानिक असलेले त्यांचे चिरंजीव डॉ. नवीन रस्तोगी हे म्हैसूरहून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गुरुवारी रात्री कर्नाटक बसने पुण्यापर्यंत आले.

पुण्याहून शिर्डीला येण्यासाठी पुणे-धुळे शिवशाही बसने (एमएच ६ बी डब्ल्यू ८५९) शिर्डीला येण्यासाठी निघाले. रस्तोगी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतीच्या तिकिटाची मागणी केली. वाहकाने तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी नसल्यामुळे पूर्ण तिकीट घ्यावे लागेल, असे सांगितले. रस्तोगी पिता-पुत्रांनी म्हैसूरहून पुण्याला येताना कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसने ज्येष्ठ नागरिकाचे तिकीट दिल्याचे दाखविले.

पोलिस ठाण्यात हे प्रकरण पोहोचल्यानंतर पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी एसटी महामंडळाचे अधिकारी आणि रस्तोगी पिता-पुत्र यांचे म्हणणे ऐकून दोघांनाही समजावून सांगितले. त्यामुळे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय दोघांनी अखेर रद्द केला. ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात असलेली सवलत ही फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या नागरिकांसाठीच आहे. इतर राज्यांतील प्रवाशांना तिकिटात ही सवलत देता येत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या