22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeमहाराष्ट्रएसटी यंदा दिवाळीत भाडेवाढ करणार नाही !

एसटी यंदा दिवाळीत भाडेवाढ करणार नाही !

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.२९ (प्रतिनिधी) दिवाळीच्या काळात दरवर्षी एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ केली जाते. यावर्षी दिवाळीतील गर्दी लक्षात घेऊन ११ ते २२ ऑक्टोबर दरम्यान सुमारे १ हजार विशेष जादा फेयांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा रद्द केली आहे. प्रवाशांना दिवाळीच्या सुट्टीत प्रचलित तिकिट दरानुसारच प्रवास करता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर… अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून ३० टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार अतिरिक्त महसूल प्राप्तीसाठी एसटी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी १० ते १५ टक्केपर्यंत तिकीट दरवाढ केली जात होती. मात्र गेली अनेक वर्षे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महामंडळाने यंदा कोरोनाच्या स्थितीमुळे सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत, आर्थिक संकटात असलेल्या सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून दिवाळीच्या हंगामात अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री परब यांनी सांगितले. या निर्णयामुळे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल, असे परब म्हणाले.

स्वारातीम विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचे निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत : कुलगूरू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या