20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रमुद्रांक शुल्कातील सवलत बंद, पण रेडीरेकनरच्या दरात यंदा वाढ नाही

मुद्रांक शुल्कातील सवलत बंद, पण रेडीरेकनरच्या दरात यंदा वाढ नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.३१ (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम व्यवसायाला दिलासा देण्यासाठी राज्‍य सरकारने मुद्रांक शुल्‍कात दिलेली सवलत आज, १ एप्रिलपासून बंद होत आहे. मात्र अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नसल्याने सन २०२१-२२ या वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याची घोषणा केली.

राज्य शासनाने सप्टेंबर २०२१ मध्ये वार्षिक मुल्यांकन तक्ता दर (रेडी रेकनर) जाहीर केला होता. या तक्त्यानुसार काही प्रमाणात का होईना, मुल्यांकनात वाढ करण्यात आलेली होती. या वाढीमुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला होता. परंतु शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्कातील सवलतीने बांधकाम व्यवसायास व लोकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. अशा परिस्थितीत या व्यवसायाला शासनाच्या पाठबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती विचारात घेऊन रेडीरेकनरमध्ये बदल करण्यात येऊ नये, अशी विनंती क्रेडाईने केलेली होती.

मुद्रांक शुल्‍क सवलत मात्र संपुष्‍टात
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुद्रांक शुल्काच्या दरात सवलत जाहीर केली होती. ही सवलत दिनांक ३१ मार्च पर्यन्त होती. मात्र आता ही सवलत संपुष्टात आली असून दिनांक १ एप्रिलपासून पूर्वीप्रमाणे मुद्रांक शुल्क दर लागू राहतील.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केवळ महिला किंवा महिलांच्या नावाने होणा-या घरांच्या खरेदी-विक्रीवर मुद्रांक शुल्कामध्ये प्रचलित दरातून १ टक्का सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेली होती. त्‍यानुसार महसूल विभागाने दिनांक १ एप्रिल पासून केवळ महिलांच्या नावाने होणा-या घराच्या अभिहस्तांतरण किंवा विक्री करारपत्राच्या दस्तावर मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरातून १ टक्का सवलत देण्याचे निश्चित केलेले आहे.

यानुसार, राज्यात कोणत्याही महिला खरेदीदाराला फ्लॅट, सदनिका, रो-हाऊस इत्यादी खरेदी करताना प्रचलित मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट देण्याचा निर्णय शासन घेत आहे. तथापी या सवलतीचा लाभ घेतल्यानंतर, संबंधित महिला खरेदीदाराला तो फ्लॅट, सदनिका, रो-हाऊस इत्यादी खरेदी दिनांकापासून १५ वर्षांच्या कालावधीपर्यन्त कोणत्याही पुरुष खरेदीदारास विकता येणार नाही. अशा प्रकारे विक्री केल्यास कमी भरलेले एक टक्के मुद्रांक शुल्क व लागू होणारा दंड भरण्यास ते पात्र असतील.

पंढरपूरच्या रणांगणावर रंगणार कडवी झुंज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या