30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यातील न्यायालये रविवारपर्यंत बंद

राज्यातील न्यायालये रविवारपर्यंत बंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी राज्यातील सर्व न्यायालयांना चार दिवसांची अतिरिक्त सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद राहणार आहे. मात्र, या काळात रिमांडवर सुनावणी होणार आहे. करोना संक्रमणामुळे न्यायालयीन कामकाजाच्या वेळादेखील कमी करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, या आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी असे दोन दिवस सुटी (गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती) असल्याने चारच दिवस कामकाज होणार होते.

त्यामुळे उर्वरित चार दिवसदेखील कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सोमवार (ता.१२), गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी (ता.१५ ते १७) देखील न्यायालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता थेट सोमवारी (१९) नियमित सुनावणी होणार आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तुटावी, म्हणून उच्च न्यायालयाने सर्व न्यायालयांना सुटी दिली आहे. त्यामुळे आपण घरी सुरक्षित राहावे. न्यायालयीन कामकाजासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन बार असोसिएशन आणि दी पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशनने वकील व पक्षकारांना केले आहे.

औदयोगिक क्षेत्राला लॉकडाउनमधून वगळा; उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या