23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रराज्य सरकार बुलेट ट्रेनचा २५ टक्के खर्च उचलणार

राज्य सरकार बुलेट ट्रेनचा २५ टक्के खर्च उचलणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या मार्गातील एक एक अडथळा हळूहळू दूर होत आहे. त्यातच आता शिंदे-फडणवीस सरकारने मोदी सरकारला एक मोठे गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्र सरकार बुलेट ट्रेनचा २५ टक्के खर्च उचलणार आहे. राज्याकडून बुलेट ट्रेनसाठीचे ६ हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

मुंबई ते गुजरातदरम्यान धावणा-या बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकार ५० टक्के तर गुजरात आणि महाराष्ट्र राज्य प्रत्येकी २५ टक्के खर्च करणार आहे. यापैकी राज्य सरकारचे ६ हजार कोटी वितरित करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारकडून मोदी यांना एकप्रकारे गिफ्ट देण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बुलेट ट्रेनचा प्रकल्प रखडला होता. शिंदे-फडणवीस सरकार येताच याला पुन्हा एकदा गती आलेली आहे. यावरुनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. हे सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. बुलेट ट्रेनसाठी ६ हजार कोटी रुपये कशासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अहमदाबाद-मुंबई फक्त दोन तासांत
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या २ तास ७ मिनिटांत पूर्ण करेल, असा अंदाज आहे. २०२३ सालापर्यंत १० डब्यांची गाडी येईल आणि १६ डब्यांची गाडी २०३३ पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील. मुंबई-अहमदाबाद ५०८ किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या