24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रतिस-या लाटेसाठी राज्याची तयारी - अजित पवार

तिस-या लाटेसाठी राज्याची तयारी – अजित पवार

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख आता कमी होताना दिसत आहे. मात्र, तिस-या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने आधीच उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेशी लढण्यास राज्य सक्षम असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तिस-या लाटेची शक्यता गृहीत धरून ऑक्सिजन निर्मितीवर भर दिला आहे. राज्यात धुळे, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत ऑक्सिजन निर्मितीबाबत अडचणी येत असल्यास उद्योगांची मदत घेणार आहे. आवश्यकता भासल्यास उद्योगपतींना सवलती देणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

तिस-या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यामध्ये प्रत्येकी एक बालरोग केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली आहे. तसेच राज्यातही लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा सध्या राज्यात तुटवडा आहे. इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

लसीकरणात पुणे पहिल्या स्थानावर
देशात सर्वांत जास्त लसीकरण महाराष्ट्रात झाले आणि त्यातही पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, लसींचा जितका पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाहीये. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस देण्यात येत आहे. त्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवले आहे. लसीसाठी केंद्राकडे पाठपुरवठा केला आहे. पुणे, मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढले आहे. रशियाची लस आलेली आहे. मात्र त्याच्या वाटपाचा निर्णय केंद्राचा आहे, असेही पवार यांनी सांगितले.

लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा
राज्यातील लॉकडाऊन एक जूननंतर वाढवायचे की नाही, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील, असे सांगत पवार यांनी पुण्यातील सद्यस्थितीत कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे नमूद केले.

रेती माफियांकडून आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या