20.8 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यातील शिक्षक भरती लांबणीवर

राज्यातील शिक्षक भरती लांबणीवर

एकमत ऑनलाईन

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरभरतीमध्ये दिलेले आरक्षण नुकतेच रद्द केले आहे. परिणामी राज्यातील शिक्षक भरती लांबणीवर पडली आहे. राज्य सरकारचे नवे आदेश आल्याशिवाय शिक्षक भरतीची प्रक्रिया केली जाणार नाही अशी माहिती आहे. आरक्षण रद्दचा राज्य सरकारच्या लेखा व कोषागार विभागातील लिपिक आणि लेखापाल भरतीवर देखील परिणाम होणार आहे.

शासकीय आदेशाशिवाय निर्णय नाही
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर शिक्षक भरतीला ब्रेक लागलेला आहे. राज्य शासनाचे आदेश आल्याशिवाय शिक्षक भरती होणार नाही. मे आणि एप्रिल महिन्यात राज्यातील ३ हजार शिक्षकांची भरती प्रस्तावित होती. मात्र, मराठा आरक्षण रद झाल्याने भरती प्रक्रिया कधी होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पवित्र पोर्टलमध्येही अनेक समस्या
शिक्षक भरती होणा-या पवित्र पोर्टलमध्येही तांत्रिक अडथळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. शिक्षण संचालनालयाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. महायुतीचे सरकार असताना शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले होते.

लिपिक भरती कंत्राटी पद्धतीने होणार
मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयामुळे लेखा व कोषागार विभागातील भरती प्रक्रिया देखील अडकली आहे. परीक्षाऐवजी कंत्राटी पद्धतीने लेखा व कोषागार विभागात लिपिक व लेखापालाची १७० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. सगळी पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा सरळसेवा पद्धतीने भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी असून कंत्राटी पद्धतीने भरण्यास विद्यार्थ्यांचा विरोध आहे. मात्र, लेखा व कोषागार विभागाने परिपत्रक वित्त विभागाला पाठवले आहे.

म्युकरमायकोसिसचे मालेगावात तीन बळी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या