24 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeमहाराष्ट्रलोकप्रतिनिधींना रस्त्यातच आडवा; उदयनराजे आक्रमक

लोकप्रतिनिधींना रस्त्यातच आडवा; उदयनराजे आक्रमक

एकमत ऑनलाईन

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेशच उदयनराजे यांनी मराठा समाजाला दिले आहेत. मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला असला तरी राज्य सरकारने आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही?, असा सवाल विचारत राजेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे.

राज्यभरात मोर्चे काढणार : मेटे
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. बीडमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील बैठक झाली. बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर १६ मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झाले. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध
मराठा आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल धक्कादायक आहे. राज्य सरकार इतर कोणत्याही वर्गावर अन्याय होऊ न देता आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. पुढील अधिवेशनात किंवा एकदिवसाचे अधिवेशन बोलवून यावर निर्णय घेऊ . कोरोनाचे संकट संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन पंतप्रधानांकडे शिष्टमंडळ नेणार असल्याचेही अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले.

लस निर्यातीचा निर्णय चुकला – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या