36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात ४ जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन

राज्यात ४ जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यात सांगली, सातारा, बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बुधवार (दि. ५ मे) पासून पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील आॅक्सिजन जिल्ह्यातून पुरवला जात आहे. त्यामुळे बुधवार, दि. ५ मे रोजी सकाळी ११ पासून पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यानुसार १५ मे पर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रुग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून सोमवारी ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली. जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती जयंत पाटील यांनी केली आहे.

नागपुरात ५ नवे स्ट्रेन
उपराजधानी नागपूर शहरात कोरोना व्हायरसचे डबल म्यूटंट आढळले आहे. दरम्यान, दिल्लीहून मिळालेल्या अहवालानुसार, ७४ सॅम्पलमधील ३५ सॅम्पलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ५ नवे स्ट्रेन आढळल्याचे समोर आले आहेत. तर इतर २६ सॅम्पलमध्ये डबल म्यूटेशन असल्याचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील मायक्रो बायोलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे यांनी सांगितले. विशेष म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप या स्ट्रेनची नवीन लक्षणं आहेत. हे सॅम्पल नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये आलेल्या संशयित रुग्णांचे असून एनआयव्ही पुणे आणि एनसीडीसी दिल्ली येथे तपासणीकरता पाठवण्यात आले होते.

बीडमध्ये ३ दिवसांचा कडक लॉकडाऊन!
बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ३ दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तीन दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. दि़ ५ मे पासून ३ दिवस दवाखाने आणि मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद राहणार आहेत़

मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे – मनसेचा हल्लाबोल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या