सातारा : कराडच्या कृणा वैद्यकीय संशोधन संचालनालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुनर्वापर करता येणारे वातानुकूलित पीपीई किटचे यशस्वी संशोधन केले आहे. कोरोनासह संसर्गजन्य आजारांवर उपचार करणा-या डॉक्टर कर्मचा-यांना नवीन पीपीई किट आरामदायी व सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. हा संसर्ग टाळण्यासाठी संबंधित आजारावर उपचार करताना डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचा-यांनी पीपीई किट घालणे अनिवार्य आहे.
मात्र, असे पीपीई किट सलग ६-६ तास घालून सेवा देणे डॉक्टरांसाठी मोठे त्रासाचे ठरते. कारण पूर्णपणे पॅकबंद असलेल्या पीपीई किटमध्ये हवेचे योग्य संतुलन होत नसल्याने घामेजलेल्या अवस्थेत सेवासुश्रुषा करावी लागते. डॉक्टर्स व आरोग्य कर्मचा-यांची प्रचलित पीपीई किट वापरताना मोठी दमछाक होते, तसेच त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
हे उपकरण वजनाला हलके असून, हाताळण्यास सोपे आहे. त्यामुळे डॉक्टरांसह नर्सेस, वॉर्ड बॉय व अन्य आरोग्य कर्मचा-यांना हे उपकरण आरामदायी पद्धतीने वापरता येणार असून, विषाणूजन्य साथीच्या आजारांच्या काळात उपचार करताना हे उपकरण त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निखील भिसे या संशोधक विद्यार्थ्याने सांगितले.