21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रशरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती उत्तम

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती उत्तम

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर मंगळवारी पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांचा पोटदुखीचा त्रास थांबला आहे. येत्या ८ ते १० दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया पित्ताशय काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. शरद पवार यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळले होते. त्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले आहेत. आता त्यांना आराम वाटत आहे. त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले

पित्ताशय काढल्यानंतरही आरोग्यावर परिणाम होणार नाही
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार यांचे पित्ताशय काढण्यात येणार आहे. पित्ताशय काढल्याने त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर काहीही परिणाम होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. पोटदुखीचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या ८-१० दिवसांत यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यामुळे त्यांना पुन्हा अ‍ॅडमिट करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची प्रकृती आणखी उत्तम वाटली तर पुढील चार-पाच दिवसांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

पंढरपूरच्या रणांगणावर रंगणार कडवी झुंज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या