24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रराजगड कारखान्यातील उसाचे गाळप सुरू

राजगड कारखान्यातील उसाचे गाळप सुरू

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यातील उसाचा गाळप हंगाम संपण्याच्या मार्गावर असून राजगड साखर कारखान्यातील उसाचे गाळ्प सुरू आहे .मात्र उसाचे प्रमाण खूप थोडे आहे गेल्या दहा वर्षातील हा सर्वात विक्रमी हंगाम ठरला आहे. हंगाम २४० दिवस सुरु होता आणि साखर उत्पादन सर्वाधिक झाले आहे असे राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

पुढील हंगामात देखील ऊस उत्पादन सर्वाधिक असणार आहे त्यामुळे येता हंगाम १ ऑक्टोबरला सुरु करण्यात यावा असा प्रयत्न असणार आहे असेही ते म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या हंगामात १० बंद असणारे कारखाने सुरू करण्यात आले होते. तसेच ज्या कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम दिली नाही अशा कारखान्यांना गाळप परवानगी देण्यात आली नाही. नुकत्याच झालेल्या हंगामात साखरेचे सर्वाधिक उत्पादन झाले आहे. त्याचप्रमाणे इथेनॉलचे १३४ कोटी लिटर उत्पादन झाले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जागतिक पातळीवर भारत साखर उत्पादनात आघाडीवर असून देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. इथेनॉल निर्मिती मुळे देशाचे परकीय चलन वाचले त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३० टक्के आहे. असे त्यांनी सांगितले.

येत्या हंगामात उसाचे उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे आढावा घेण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे १५ नोव्हेंबर ते १५ मार्च असा हंगाम राहतो पण पुढील हंगामात उसाचे प्रमाण अधिक असणार आहे त्यामुळे हंगाम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे राज्यातील साखर कारखान्यांची इथेनॉल क्षमता सध्या २०० लिटर असून पुढील हंगामात ३०० लिटर वाढेल असे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या