22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात एमपीएससीची तयारी करणा-या तरुणाची आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणा-या तरुणाची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणा-या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

तरुणाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्रिभुवन कावले (३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा जालन्याचा रहिवासी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता. प्राथमिक माहितीनुसार त्रिभुवन जानेवारी २०२१ पासून पुण्यात राहात होता. आज दुपारी त्याच्या राहत्या खोलीत तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात त्याने नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

वेळखाऊ प्रक्रियेमुळे नैराश्य वाढल्याचा आरोप
एमपीएससीची निवड प्रक्रिया कमालीची वेळखाऊ आणि तेवढीच असंवेदनशील बनल्याने लाखो तरुणांची उमेदीची वर्षे एमपीएससीच्या मृगजळामागे लागल्याने वाया जात आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी १८ ते २० लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र, दरवर्षी भरल्या जाणा-या पदांची संख्या चार ते पाच हजार असते. मात्र, वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकालाचे काम कधीच एमपीएससीकडून होत नाही. त्यात मराठा आरक्षण आणि कोरोनामुळे तरुणांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. यातून निराशा वाढत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या