21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रमानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

पुणे : तरुणाकडे वारंवार मागणी करूनही उसने पैसे परत न केल्याने आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका २८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऐश्­वर्या सुरवसे (रा. खराडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी बालाजी सुरवसे यांनी फिर्याद दिली असून प्रणीत जगताप-पाटील (रा. परंडा, जि. उस्मानाबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ जानेवारीला खराडीतील लेडीज हॉस्टेलमध्ये घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्­वर्या आणि जगताप हे दोघे एकमेकांना ओळखत होते. तरुणीने आरोपीला उसने पैसे दिले होते. आरोपीकडे तरुणीने वारंवार उसने पैसे परत करण्याची मागणी करूनही आरोपीने पैसे परत करण्यास नकार दिला. तसेच मानसिक त्रासही दिला. या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्येचे पाऊल उचलले. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या