31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रडॉ. शितल आमटे यांची आत्महत्या

डॉ. शितल आमटे यांची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांची आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसेच, शीतल आमटे-करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे

डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आले होते़ डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर अनेक चर्चांना उत आला होता. त्यानंतर आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.

संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिले आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुलीही दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे, असे त्या निवेदनात स्पष्ट केले होते़

कोण आहेत शीतल आमटे
डॉ. शीतल आमटे या विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा त्यांनीही जोपासला होता. २००३ मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे त्यांनी शिक्षण घेतले होते़ शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला. शीतल आमटे या अपंगत्व विशेषतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या.

आठ तासांपूर्वी केले होते ट्विट
डॉ. शीतल यांनी आठ तासांपूर्वी एक कॅनव्हास पेंटिग ट्विट केले होते़ युद्ध आणि शांतता असे त्या ट्विटमध्ये म्हटले होते.

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या