24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेला साथ या वक्तव्यावरुन सुजय विखेंचा यूटर्न

शिवसेनेला साथ या वक्तव्यावरुन सुजय विखेंचा यूटर्न

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होते. परंतू त्याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला गेला. जिल्ह्यात राजकीय निर्णय घेताना प्रदेश भाजपा पदाधिका-यांचाच अंतिम आदेश मानला जाईल, अशी भूमिका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आता स्पष्ट केली आहे.

पारनेर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले होते. मला निवडून आणण्यात शिवसैनिकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे कारवाई झाली तरी आपण शिवसेनेसोबत राहू मात्र आता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पारनेर तालुक्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात शिवसैनिकांवर होत असलेला अन्याय तसेच राज्यात आघाडी सरकार असतानाही तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा होत नसलेला विचार पाहाता या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहाण्याचीकिंवा त्यांना बरोबर घेवून जाण्याच्या दृष्टीने आपण भाष्य केले. परंतु माझ्या वक्तव्याचा थेट राज्यातील राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला असल्याचे विखे पाटील म्हणाले.

जिल्ह्यात कोणतीही राजकीय भूमिका किंवा निर्णय करताना अंतिम निर्णय हा प्रदेश आणि जिल्ह्यातील भाजपा पदाधिका-यांना विश्वासात घेवूनच करण्याची भूमिका आपली कायम असून याबाबतचा अंतिम निर्णय सुध्दा त्यांचाच असणार आहे. पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीची वस्तूस्थिती आपण वरिष्ठांना देवून यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या