22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रजॅकलिनला पुन्हा समन्स

जॅकलिनला पुन्हा समन्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता ईडीकडून जॅकलीनला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे. १९ सप्टेंबरला (उद्या) जॅकलीनला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

१४ सप्टेंबरलादेखील जॅकलीनला ईडीने न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी जॅकलीनची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली होती. ईडीने जॅकलीनचा जबाब नोंदवून घेतला होता. त्यावेळीच जॅकलीनला पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली होती. १४ सप्टेंबरला जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरसोबत तिचे असणारे नातेसंबंध आणि त्याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या