24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत यांना समन्स

संजय राऊत यांना समन्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स जारी केले आहे. राऊतांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याविरोधात सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊतांनी केला होता.

त्यामुळे याप्रकरणी किरीट दाम्पत्याने अवमान झाला असल्याची तक्रार दिली होती.
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत त्यांच्यावर आरोप करत आहेत. दरम्यान, मविआकडूनही सोमय्यांनी केलेल्या कथित घोटाळ्यांची माहिती बाहरे काढण्यात आली. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत.

त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट हे मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. या कामात बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिका-यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला होता. पर्यावरणाचा -हास झाल्याची कारणे दाखवून सुमारे १०० कोटींचा हा घोटाळा आहे. मग घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे असे वक्तव्य राऊत यांनी केले होते.

यावर हे सर्व प्रतिमा मलिन करणारे आहे आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे असून यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे, असा दावा करत मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने राऊत यांना समन्स बजावत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या