24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रशुक्ला, सिंग यांना समन्स

शुक्ला, सिंग यांना समन्स

एकमत ऑनलाईन

पुणे : फोन टॅपिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला आणि १०० कोटी वसुली प्रकरणामुळे बेपत्ता असलेले परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी आगोयाने दोघांनाही समन्स बजावला आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाची आयोगाच्या मार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे आदेश कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले आहेत. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला, त्यावेळी परमबीर सिंग लॉ अ‍ॅण्ड ऑर्डरचे एडीजी व रश्मी शुक्ला या पुणे पोलिस आयुक्त होत्या. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट व इतर माहिती महत्वाची असल्याने त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे आशिष सातपुते यांनी म्हटले. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी परमबीर आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. रश्मी शुक्ला पोलिस महासंचालक आणि राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना अधिका-यांच्या बदल्यांबाबत अनेक मंत्र्यांच्या पीएनजी तसेच काही खाजगी व्यक्तींचे फोन टॅप केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा भीमा कोरेगाव प्रकरणी रश्मी शुक्ला यांना चौकशीला बोलावले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या