21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रकोल्हापूर शहरप्रमुखपदी सुनील मोदी, रविकिरण इंगवले

कोल्हापूर शहरप्रमुखपदी सुनील मोदी, रविकिरण इंगवले

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता पक्षबांधणीवर भर दिला आहे. पक्षातील ४० आमदार शिंदे गटात गेल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी निवडी नव्याने सुरू केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी नव्याने जाहीर करण्यात आले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. माजी नगरसेवक सुनील मोदी आणि रविकिरण इंगवले यांच्याकडे शहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सुनील मोदी यांची कोल्हापूर उत्तर विधानसभा तर रविकिरण इंगवले यांची कोल्हापूर दक्षिण शहर विधानसभा शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युवा पदाधिकारी हर्षल सुर्वे यांच्याकडे शहर समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या