34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला मागणीप्रमाणे लस पुरवठा करा

महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लस पुरवठा करा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी राज्यसरकारने दररोज ४ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन सुरु केले आहे. त्यामुळे केंद्रसरकारने महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रिय आरोग्यमंत्र्यांकडे केली.
केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते. यावेळी टोपे यांनी ही मागणी हर्षवर्धन यांच्याकडे केली.

२५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणास मुभा द्यावी, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत. राज्यात कोरोना लसी वाया जाण्याचे प्रमाण अन्य राज्यांपेक्षा फारच कमी असून राज्याचे लसीकरणाचे ध्येय पुर्ण करण्यासाठी राज्याला केंद्र सरकारकडून मागणीप्रमाणे लसीचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या.

देशात लसीचा तुटवडा नाही : हर्षवर्धन
राजेश टोपे यांच्या मागणीची दखल घेत केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील कोणत्याही भागात केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांचे बेजबाबदार वर्तन मोठी समस्या
हर्षवर्धन यांनी यावेळी देशात परिस्थिती नियंत्रणात असून अद्यापही अनेक त्रुटी असल्याचे सांगितले. कोरोनाचा कहर पुन्हा वाढण्यामागे नागरिकांचा निष्काळजीपणा व बेजबाबदार वर्तन कारणीभूत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मात्र तरीही देशाचा रिकव्हरी रेट ९२.३८ असून मृत्यूदर १.३० टक्के आहे.

पोलिस अधिका-यांच्या राजकीय निष्ठा तपासणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या